Take a fresh look at your lifestyle.

शेतकऱ्यांनी रब्बी पिकांचा विमा कसा काढावा ? काय आहे पात्रता, कागदपत्रे अन् अर्ज प्रोसेस..

सध्या राज्यातील विविध भागांत रब्बी पिकांच्या पेरणीची कामे जोमात सुरू आहेत. शेतकरी रब्बी पिकांच्या पेरणीत गुंतले आहेत, आणि गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा रब्बी पिकांची पेरणी देखील जास्त झाल्याचे सांगण्यात येत आहे. अशातच अवकाळी पावसाचे सावट नेहमीच शेतकऱ्यांना चिंतेत टाकण्याचे काम करत असते, अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी पिकांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे.

पिकांना विमा संरक्षण देण्यासाठी, शेतकर्‍यांनी त्यांच्या रब्बी पिकांचा विमा काढला पाहिजे जेणेकरून कोणत्याही संभाव्य नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे झालेले नुकसान भरून काढणे शक्य होईल. यासाठी पीएम पीक विमा योजना शेतकऱ्यांच्या पिकांसाठी संरक्षण कवच म्हणून काम करत आहे. शासन आपल्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये जागृती करत असून पिकांचा विमा काढण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांना मिळते नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई..

पीएम पीक विमा ही अशी योजना आहे जी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी खूप कामाची आहे. पाऊस, गारपीट, अतिवृष्टी, वादळ इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाचे नुकसान झाल्यास या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या पिकांना विमा संरक्षण दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळते. पीएम पीक विम्याअंतर्गत कोणत्या रब्बी पिकांचा विमा काढू शकतो आणि रब्बी पिकांचा विमा कोणत्या दराने काढला जाईल याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत.

पीएम पीक विमा योजनेत किती असेल प्रीमियम..

सर्व पिकांसाठी शेतकर्‍यांनी भरावयाचा प्रीमियम, रब्बीमध्ये विम्याच्या रकमेच्या कमाल 1.5 टक्के आणि वार्षिक नगदी पिकाच्या विम्याच्या रकमेच्या 5 टक्के इतका मर्यादित केला गेला आहे. शेतकर्‍यांच्या हिश्श्याव्यतिरिक्त, विमा हप्त्याची रक्कम केंद्र आणि राज्य सरकारे सम-समान प्रमाणात उचलतील. हा विमा दर सर्व राज्यांना लागू असणार आहे.

कुठे मिळणार पीक विमा

जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांना ते ज्या बँकेशी संलग्न आहेत अश्या संबंधित बँकेकडून पीक विमा काढणे बंधनकारक असून कर्जदार शेतकरी संबंधित बँक, कॉमन सर्व्हिस सेंटर यांच्यामार्फत विहित विमा हप्त्याची रक्कम जमा करून स्वेच्छेने आपल्या पिकांचा विमा काढू शकतात. रब्बी हंगामातील योजनेतून माघार घेण्यासाठी कर्जदार शेतकऱ्यांनी संबंधित बँकेत लेखी घोषणापत्र सादर करण्यासाठी 24 डिसेंबर ही शेवटची तारीख असणार आहे. यासोबतच कर्जबाजारी शेतकऱ्याने पीक बदलाची माहिती संबंधित वित्तीय संस्थेला देण्यासाठी 29 डिसेंबर 2022 ही अंतिम तारीख असणार आहे.

शेतकऱ्यांना त्यांच्या रब्बी पिकांचा विमा मिळेपर्यंत..

शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा विमा काढण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२ ही शेवटची तारीख देण्यात आली आहे. या तारखेपर्यंत शेतकरी त्यांच्या पिकांचा विमा काढू शकतात. दुसरीकडे, छत्तीसगडसारख्या काही राज्यांमध्ये, ही तारीख 15 डिसेंबरपर्यंत असणार आहे. याशिवाय पीएम पीक विमा योजनेच्या अधिकृत वेबसाइट https://pmfby.gov.in/ वर जाऊन तुम्ही पीक विम्याशी संबंधित माहिती मिळवू शकता.

पीक विमा काढण्यासाठी कोण-कोणती कागदपत्रे लागतात ?

पीएम फसल विमा योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना त्यांच्या पिकांचा विमा उतरवण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत-

अर्जदार शेतकऱ्याचे आधार कार्ड
पत्त्याचा पुरावा
7/12, 8 अ
भाडेकरू शेतकरी असल्‍यास जमिनीच्‍या मालकीचे प्रमाणपत्र / प्रतिज्ञापत्र इ. कागदपत्रे आवश्‍यक असतील.

नुकसान भरपाई निश्चित करणेसाठी सादर करावयाची आवश्यक कागदपत्रे :-

शेतकऱ्याने नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज

आवश्यक त्या कागदपत्रासह..

7/12, पिकाची नोंद असलेला विमा हप्ता भरल्याचा पुरावा इ.

Leave A Reply

Your email address will not be published.