Take a fresh look at your lifestyle.

सुजय विखेंच्या ‘त्या’ वक्तव्यावरून भाजपला फटका ! कार्यकर्ते संभ्रमात तर भाजपचे मोठे नेतेही नाराज..

भाजपचे उमेदवार आणि महाराष्ट्राच्या अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील खासदार सुजय विखे आपल्या वक्तव्यामुळे विरोधकांना टीका करण्याची आयती संधी तर दिलीच आहे, परंतु राज्यातील भाजपचे मोठे नेतेही नाराज झाले असल्याची माहिती आहे.

सुजय विखे यांनी तुतारी वाजवून टाकण्यासंदर्भातला व्हिडिओ प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे..

सोमवारी एका निवडणूक सभेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना विखे म्हणाले की, ‘काही लोकांना सुजय विखे मान्य नसतील तर मोदींचे नाव सांगा, आमच्या दोघांची अडचण असेल तर ताईंचे (आ. मोनिकाताई राजळे) नाव सांगा. तिघांची अडचण असेल तर अरुण मुंडेंचे (भाजप सरचिटणीस) नाव सांगा. आमची सर्वांची अडचण असेल तर तुतारी वाजवून टाका”, असे म्हणत सुजय विखे यांनी भरसभेत हात जोडले..

या आधी नवनीत राणा यांनी सोमवारी अमरावती लोकसभा मतदारसंघातील सभेला संबोधित करताना म्हणाले की, मागच्या निवडणुकीच्या वेळेस संपूर्ण देशभर मोदींची लाट होती. एक मोठी यंत्रणा मतदारसंघात काम करीत असतानासुद्धा मोदींच्या लाटेत मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले. त्यामुळं एका अपक्ष उमेदवाराचा झेंडा अमरावती मतदासंघात गाडला गेला.

म्हणून यावेळी देखील मोदींच्या लाटेच्या भरवशावर न राहता भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं बूथ स्तरावर लक्ष द्यायला हवं. ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणं प्रत्येक घरातील व्यक्तीकडून दुपारी बारा वाजेपर्यंत मतदान करून घेण्याची जबाबदारी सर्व कार्यकर्त्यांची आहे, भाजप उमेदवारांच्या अशा वक्तव्यांमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

नगरमध्ये सुजय विखे यांचा भाषणातील तोल सुटत चालला असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विखेंच्या मनमानी कारभाराला कंटाळून कार्यकर्त्यांचे राजीनामा सत्र सुरु आहे. अहमदनगरात भाजपला मोठे भगदाड पडल्याचे चित्र आहे. ‘तुतारी वाजवा’ वक्तव्यावरून अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात भाजपला मोठा फटका बसणार असल्याचे राजकीय जाणकार सांगत आहे..

भाजपचे सरचिटणीस सुनील रासने यांनी आपल्या पदांचा राजीनामा देत, सुजय विखे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रासने म्हणाले,”पार्टी म्हणजेच मी आणि मी म्हणजेच मतदार संघातील जनता, असा समज करून त्यांनी घेतला आहे. गेल्या पाच वर्षात कधीही सुजय विखे यांनी नागरिकांचे फोन न उचलेले नाहीत तसेच मतदारसंघात ढुंकुण देखील पाहिले नाही. त्यामुळेच आता डाळ आणि साखर वाटण्याचे काम ते करत आहेत. परंतु मतदारांशी संवाद साधला असता तर ही वेळ आली नसती.” असा टोला रासने यांनी सुजय विखेंना लगावला.

काही दिवसांपूर्वी सुजय विखे यांनी निलेश लंके यांना आव्हान देत ‘निलेश लंके यांनी पाठांतर करुन माझ्यासारखे फाडफाड इंग्रजी बोलावे, आपण उमेदवारी मागे घेऊ’ असे म्हणाले होते. यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती.

यानंतर आता ‘आमच्या नावे मान्य नसतील तर तुतारी वाजवून टाका’, असे आवाहन सुजय विखे यांनी मतदारांना केल्याने भाजपमधील मोठे नेते नाराज झाले असल्याचे बोलले जात आहे..

Leave A Reply

Your email address will not be published.