Take a fresh look at your lifestyle.

सोनगाव ग्रामस्थांच्या वतीने पंचक्रोशीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान !

अहमदनगर टाइम्स 24 टीम, 4 फेब्रुवारी 2022 : सोनगाव ग्रामपंचायत,स्वरूप सामाजिक फौडेशन तसेच सोनगाव ग्रामस्थांच्या वतीने पंचक्रोशीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान आज सोनगाव पंचक्रोशीतील इयत्ता आठवीच्या शिष्यवृती परीक्षेत ओमकार अंञे,स्वराज अंञे,ओम दिघे व अफिफा तांबोळी यांनी गुणवत्ता यादीत विशेष प्राविण्य मिळविलेले व कु तन्वी विनोद अंञे यांची कृषी जैवतंञज्ञान च्या राष्ट्रीय कांदा व लसून संशोधनासाठी निवड झाली.

तर कु साक्षी रवींद्र ताजणे यांची सातारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात M.B.B.S साठी निवड झाली तसेच शामराव पाटील अंञे यांची संत सावता माळी युवक संघाच्या राहुरी तालुका अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल या सर्व मान्यवर विद्यार्थी व पदाधिकारी यांचा सोनगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या वतीने शुभेच्छा देऊन अभिनंदन केले तसेच शाल पुष्पगुच्छ देऊन सोनगाव ग्रामपंचायत स्वरूप सामाजिक फौडेशन व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

माजी मंञी राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या वतीने ही शुभेच्छा देण्यात आल्या तर उपस्थित मान्यवरांकडून सर्व विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी सोनगाव सोसायटीचे चेअरमन राजेंद्र अनाप,सावता पतसंस्थेचे चेअरमन लक्ष्मण तात्या अंञे शिक्षक बॅंकेचे मा चेअरमन साहेबराव अनाप, सोपान पा अंञे, वसंत पा अंञे, संतोष पा अंञे,शरद पा अंञे,

बिपीन पा ताठे,संदीप पा अनाप,ऋषीकेश पा अंञे,शकुरभाई पा तांबोळी,वसंत पा अंञे, पाराजी पा अंञे, संदीप पा अंञे, विनोद पा अंञे, दिनकर पा अंञे, अरूण पा दिघे, रवींद्र पा ताजणे, किरण पा अंञे, महेंद्र पा अनाप, सुनिता पा ताजणे, भारती पा अंञे यांच्यासह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.