लोकवस्ती मधून जाणाऱ्या मुख्य विद्युत प्रवाह वाहिनीवर कापरी पाईप, पट्टी बसाव्यात, तसेच येत्या पाऊस काळात नागरिकांच्या जीविताला संरक्षण द्यावे अश्या विविध मागणीचे निवेदन दिले.
जामखेड तालुक्यातील जामखेड शहरासह लोकवस्त्या वरील काही गावात मुख्य प्रवाहाच्या वाहिनी गेलेल्या आहेत. तरी खूप वर्षापूर्वी या विद्युत वाहिन्याचे कामे झालेले आहेत. तदनंतर मानवी शहर वस्ती वाढलेली आहे. त्यातच ऊन, वारा, पाऊस यामुळे विद्युत खांबावरील ताण व तसेच विद्युत वाहिन्यांची झालेली झीज याने बऱ्याच ठिकाणी नागरीकांचे व शेतकऱ्यांचे जीवीत हानीसहीत नुकसान होत आहे.
विद्युत वाहिन्यांच्या तारा अचानक तुटत आहेत, खांबे सुद्धा अचानक कोलमडत आहेत. त्यातच काही डि. पी. चे फ्युजाचे दरवाजे सुद्धा तुटलेले आहेत काही ठिकाणी उघडेच राहिलेले आहेत.
तसेच जामखेड शहरामध्ये जुन्या डि.जे. हॉटेलच्या पाठीमागील परिसरात राहणाऱ्या नागरीकांच्या घरावरून मेन लाईन गेलेली आहे. याच भागात दि. २६/०५/२०२३ रोजी कु. ओमी मस्कर वय ९ वर्षे रा. वरकुटे ता.करमाळा जि.सोलापूर येथील रहिवासी आहे.
ही आपल्या नातेवाईकाच्या घरी लग्नानिमित्त आली असता, स्लॅप खेळत असताना तीला या घरासमोरून गेलेल्या मेनलाईनचा धक्का बसला त्यात तिचा मृत्यु झाला अशा घटना अगोदरसुद्धा खूप वेळेस झालेल्या आहेत परंतू येणाऱ्या पाऊस काळात अशा घटना घडू नयेत यासाठी विद्युत वाहिन्यावर तारेवर कापरी पाईप पट्ट्या तसेच विद्युत पोलचे ताण आवळून संरक्षण होईल व मानवी जीवीत हानी होणार नाही.
अशी लोकवस्तीमधील लोकवर्दळ असलेल्या भागात योग्य त्या उपाय योजना करण्यात याव्यात ही नम्र विनंती, अगर तसे न झाल्यास होणाऱ्या जीवीत हानीस व नुकसानीस आपल्याला जबाबदार धरले जाईल.
असेही निवेदनात म्हटले, मागन्या मान्य जर केल्या नाहीत तर मी एक नागरीक म्हणून आपल्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल असा सज्जड इशारा देण्यात आला आहे.