दि.04/05/2023 रोजी जामखेड येथील रत्नदीप मेडिकल फौउंडेशन व रिसर्ज सेंटर या मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष श्री. डॉ. भास्कर मोरे यांनी एका 19 वर्षीय महाविद्यालयीन तुरुणीचे लैंगिक शोषण करून बळजबरी केली आहे. त्या संदर्भात दि. 29/05/2023 रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालय जामखेड येथे लाक्षणीक उपोषण करण्यात आले.
रत्नदीप मेडिकल फौउंडेशन व रिसर्ज सेंटर या मेडिकल कॉलेज मध्ये महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यातून मुले – मुली शिक्षण घेण्यासाठी येतात. यातील अनेक मुले-मुली ही गरीब घरातील आहेत. आपल्या आयुष्यातील कमावलेल्या सर्व संपत्ती पणाला लावून हे पालक आपल्या मुलांना या ठिकाणी शिक्षणासाठी पाठवत असतात.
या कॉलेजच्या जवळच्या परिसरामध्ये हे मुलं-मुली निवासी राहतात. या बाहेरगावच्या मुलांना या ठिकाणी कोणाचा आधार नसतो. हे कॉलेजची सर्व मुलं-मुली हे कॉलेजच्या अध्यक्ष व शिक्षक वर्गालाच आपले गुरु व पालक मानत असतात.
आपल्याला आलेल्या अडचणी त्यांना सांगत असतात. मागील काही महिन्यापूर्वी या कॉलेजमधील मुलींनी आत्महत्या केल्या आहेत. या घटना नक्की का घडतात ? या घटनेमध्ये अध्यक्षांचा काही हात तर नाही ना ? तसेच अजून किती मुली आहेत की त्या लैंगिक अत्याचार होत असताना फक्त भीतीपोटी समोर येताना दिसत नाही ? या मागील काळामध्ये काही मुलं-मुलींना कॉलेजची पूर्ण फी भरली असताना निकाल पत्र देताना पैशाची मागणी करून त्यांना मानसिक व आर्थिक त्रास देण्याचे प्रकरण याच कॉलेजवरच का घडते ?
तसेच या कॉलेजचे सी.सी.टीव्ही कॅमेरे चेक का केले जात नाहीत ? शासनाने काही अटी व शर्ती नंतर या कॉलेजला मान्यता दिली असताना या अटी व शर्ती पूर्ण नसताना या कॉलेजला मान्यताच मिळालीच कशी ? असे अनेक प्रश्न समोर येत आहेत. या तक्रारीचा गंभीर दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करून पीडित मुलीला न्याय मिळावा व जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी पूर्ण होत नाही.
तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याची माहिती दिली. तसेच या संबंधित अध्यक्षांवर काठोरतील कठोर कारवाई करण्यात यावी. अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष आतिश पारवे यांनी दिली.
तोंडी आश्वासनानंतर उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी उपोषणकर्त्यांचे उपोषण सोडण्यासाठी जामखेड तहसील चे नायब तहसीलदार भोसेकर साहेब व जामखेड पोलीस स्टेशनचे API सुनीलजी बडे साहेब उपस्थित होते.
तसेच या लाकक्षणीक उपोषणास म.न.से ता. उपाध्यक्ष सनी सदाफुले, भिमटोला संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब गायकवाड, रा.स.पा. युवक जिल्हाध्यक्ष विकास मासाळ, रा.स.पा. तालुका अध्यक्ष नंदू खरात, हेमंत गायकवाड पिटीशन रायटर, रिक्षा युनियन संघटनेचे आबेद शेख, व इतर संघटनेने पाठिंबा दिला. वंचित बहुजन आघाडीचे जामखेड तालुका अध्यक्ष अतिश पारवे,
वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष अजिनाथ शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे तालुका उपाध्यक्ष सागर ससाने, किशोर मोहिते, वंचित बहुजन आघाडी तालुका उपाध्यक्ष गणेश घायतडक, वंचित बहुजन आघाडीचे जामखेड शहर उपाध्यक्ष सुधीर कदम, लाला वाळके, सुरज बिरंलिगे, मोहन शिंदे, मोहन चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते सुनील भाऊ साळवे, रवी (अण्णा) घायतडक, विशाल समिंदर, अक्षय शिरोळे, संतोष सदाफुले, संतोष रजपूत, तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते