Take a fresh look at your lifestyle.

राहुरी शहरातील तनपुरेंची दहशत मोडीत काढणार ! युवा नेते अक्षय कर्डिलेंनी दंड थोपटले, पहा व्हायरल व्हिडीओ..

राहुरी शहरातील राजकीय प्रस्थापितांची असणारी दहशत मोडीत काढण्यासाठी भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी असून अन्यायाला वाचा फोडून न्याय दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही अशी गर्जना करत राहुरी शहरातील शनि देवाचे दर्शन घेऊन अक्षय कर्डिले यांनी दंड थोपटले.

राहुरी मतदार संघात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना मोठं शक्तिप्रदर्शन केलं.

मिरवणूक राहुरीच्या भरपेठेत शनी चौकामध्ये आली तेव्हा कर्डिले यांचे चिरंजीव युवा नेते अक्षय कर्डिले यांनी मांडी व दंड थोपटून प्रस्थापितांना इशारा दिला असून राहुरी शहरातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

हा व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असून राहुरी तालुक्यात वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे. यामुळे राहुरी – नगर – पाथर्डी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही चांगलीच गाजणार आहे.

C5371

दूधवाला ते लोकप्रिय आमदार अशी बिरुदावली मिळविलेल्या शिवाजी कर्डिलेंचा नगर व पाथर्डी भागात प्रभाव आहे, आता राहुरीमध्ये इतर बड्या नेत्यांचा देखील कर्डीले यांना पाठिंबा मिळतोय. जनतेच्या हृदयातील आमदार म्हणून ओळख असलेले स्व. शिवाजीराव गाडे यांचे चिरंजीव धनराज गाडे आणि माजी जी. प. सदस्य भास्करराव गाडे यांनी कर्डीले यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केलाय. दोन बड्या नेत्यांचा भाजपात पक्षप्रवेश झाल्याने कर्डीले यांची राहुरीत ताकद वाढली आहे.

त्यातच आता धर्मवीर छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू शेटे पाटील यांनी देखील शिंदे गटात प्रवेश करत कर्डीले यांना पाठिंबा दर्शवलाय.

तर आमदार चंद्रशेखर कदम यांचे चिरंजीव व देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित कदम यांचेही बंड शमलं असून ते भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी सक्रिय झाले आहे. या तीन सुखद धक्क्यांमुळे कर्डिलेंच राहुरी शहरासह संपूर्ण तालुक्यात वजन वाढलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.