गावगावातलं वातावरण बदलतंय ! राहुरीतील गावा गावांत महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना वाढता प्रतिसाद..
जिरायत भागातील प्रश्नांची जान असल्यामुळे जिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दूध धंदा व्यवसाय करण्यासाठी चार गाय खरेदीसाठी ३ लाख रुपयाचे कर्ज देण्याचे काम केले आहे. सर्वसामान्य कुटुंबातील व्यथा मला माहित आहे राहुरी मतदार संघाचे लोकप्रतिनिधी यांनी गेल्या ५ वर्षांमध्ये कुठलेही विकासाचे भरीव काम मार्गी लावू शकले नाही. सत्ता असताना मंत्री पदाच्या काळात वांबोरी चारी टप्पा दोन चे काम मार्गी लावले नाहीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सरकार आल्यानंतर हा प्रश्न मार्गी लावला लवकरच त्याचे काम देखील सुरू होणार आहे.
पावसाने भरलेल्या तलावांचेच जलपूजन करण्याचे काम त्यांनी केले माझी निवडणूक मतदार संघातील जनतेने हातात घेतली असल्यामुळे त्यांची पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे ते आता बिनबुडाचे आरोप करत सुटले आहे. आम्ही लोकशाही पद्धतीने निवडणूक लढवत असून आमच्यावर दहशत गुंडगिरीचे आरोप करत आहे. मात्र जनता आता भूलथापांना बळी पडणार नाही मी १५ वर्षांमध्ये राहुरी पाथर्डी या भागात कधी कोणावर दहशत दादागिरी केली का हे दाखवून द्यावे राहुरी नगरपालिकेची सत्ता गेली ४० वर्ष त्यांच्याकडे आहे.
त्यांनी सत्तेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकली आणि कवडी मोलाच्या किमतीत खरेदी केली आणि शासनाकडून ते आरक्षण उठवली जातात, तुम्ही काय दिवे लावतात हे जनतेला माहित आहे माझी कितीही बदनामी करा लोक माझ्या बरोबर आहे. पाथर्डी तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने पुढे येऊन मला निवडणुकीसाठी आर्थिक मदत देत आहे, मी केलेल्या कामाची पावती मिळत असल्याची प्रतिपादन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले.
राहुरी पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघातील महायुती भाजपचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी गाव भेट दौऱ्या निमित्त मिरी परिसरातील नागरिकांशी संवाद साधला यावेळी मा. सभापती संभाजी पालवे, अनिल गीते, वैभव खलाटे, शिवाजी पालवे, एकनाथ आटकर, शिवाजी घोरपडे, पोपट कराळे, प्रमोद गाडेकर, अशोक मिसाळ, किरण ससे, साहेबराव गवळी, पोपट गवळी, नाथा गवळी, अनिल शिंदे, यशवंत गवळी, सर्जेराव सोलत, संजय मोहिते, अशोक दहातोंडे, आप्पासाहेब वांडेकर, शिवाजी जाधव, रघुनाथ खाडे, भीमराव मचे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नागरिकांनी विकासाची कामे मागितल्यानंतर राहुरीचे लोकप्रतिनिधी जनतेला उलट उत्तरे देत म्हणतात की मी काय कपडे काढून देऊ का, ६ खात्याचे मंत्री असताना देखील त्यांनी मतदारसंघातील रस्त्यांची कामे मार्गी लावली नाहीत. त्यांना आता निवडणुकीच्या काळामध्ये मुरूम टाकण्याची वेळ आली आहे.
५ वर्षांमध्ये त्यांनी कधीही पाझर तलाव भरून देण्याचे काम केले नाही मात्र पावसाने भरलेल्या तलावाचे जलपूजन त्यांनी केले, सत्तेवर नसताना देखील विकासाची कामे मार्गी लावली मिरी परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होता मात्र तो सोडविण्याचे काम माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी केले शेतकऱ्यांच्या अडचणीचे काळात धावून येणारे नेतृत्व आपल्याला मिळाले आहे असे मत माजी सभापती संभाजी पालवे यांनी व्यक्त केले.