राहुरीत वातावरण फिरलं ! राजू शेटे पाटलांचा समर्थकांसह शिवसेनेत प्रवेश, शिवाजीराव कर्डिले यांना पाठिंबा..
यंदा राज्यात विधानसभा मतदार संघातील निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. नेत्यांसह कार्यकर्ते विविध पक्षांत प्रवेश करीत आहेत. बंडखोर व अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरणार असल्याने रंगत वाढली आहे.
गेल्या विधानसभेला आ. प्राजक्त तनपुरे यांनी माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचा थोडक्यात पराभव केला असला तरी, आता शिवाजी कर्डीलेंनी ना. राधाकृष्ण विखेंच्या मदतीने या गटावर पुन्हा कमळ फुलविण्याचे मनसुबे आखले आहेत.
राहुरी विधानसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झाल्यास शिवाजी कर्डीलेंचे नगर व पाथर्डी तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती गणावर वर्चस्व आहेच, मात्र आता कर्डिलेंचे वजन राहुरी तालुक्यातही वाढले आहे..
2 दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेल्या बारागाव नांदूर व सात्रळ गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य फोडून कर्डिलेंनी आ. तनपुरेंना ‘जोर का झटका’ दिला आहे. आता पुन्हा एक जबरदस्त हादरा देत राहुरी तालुक्यातील धर्मवीर छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू शेटे पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शेटे पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश करताच राहुरी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
सध्या राज्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर राजू शेटे पाटील यांचा प्रवेश सोहळा पार पडणार असल्याची माहिती समोर आलीयं. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर राजू शेटे पाटील यांना महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांना पाठिंबा जाहीर केला असून कर्डिले यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असं आवाहनही केलं आहे..
तसेच शिवाजीराव कर्डिले यांच्यासाठी महायुती शासनाच्या कालवधीत आलेल्या लाडकी बहिण योजना, मोफत तीन गॅस सिलेंडर, शेतकर्यांची वीजबील माफी, शेतकर्यांना मिळालेली नुकसान भरपाई तसेच मिळालेला पीक विम्याचा अनपेक्षित लाभ व निळवंडेचे तालुक्यात महायुतीच्या काळात आलेले पाणी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता, त्याचबरोबर तालुक्यात विखे गटाचे असलेले भक्कम संघटन या जमेच्या बाजू दिसत आहेत. तसेच कर्डिले यांनी राहुरी तालुक्यातील प्रत्येक गावात कार्यकर्त्यांचा संच तयार केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसून येत आहे.