Men’s Health : एक ग्लास दुधात फक्त एक चमचा मध टाकून प्या ; वैवाहिक जीवनातील ‘या’ 6 समस्या होतील दूर…
अहमदनगर टाइम्स 24 टीम, 16 जानेवारी 2022 : दूध हा आरोग्यासाठी खूपच महत्त्वाचा पदार्थ आहे. म्हणूनच अनेक तज्ञलोक मुलांपासून वृद्धांपर्यंत दूध पिण्याची शिफारस करतात. त्याचबरोबर मधाचा वापर केल्यास अनेक समस्यांवर मात केली जाऊ शकते. विशेषत: त्वचेच्या सौंदर्यासाठी आणि सर्दी-खोकल्याचा त्रास कमी करण्यासाठी याचा सर्वाधिक वापर केला जातो. अशा परिस्थितीत या दोघांचे एकत्र सेवन केल्याने तुमच्या आरोग्यास अनेक फायदे मिळू शकतात.
दुधामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-डी, कॅल्शियम,प्रोटिन्स तसेच लैक्टिक ऍसिड यांसारख्या अनेक पोषक तत्वांचा समावेश असतो. तसेच, जेव्हा मधाचा विचार केला जातो तेव्हा त्यात व्हिटॅमिन-सी,आयर्न, फॉस्फेट, कॅल्शियम, फ्रुट्स ग्लुकोज, सोडियम, पोटॅशियम, क्लोरीन यांसारखे अनेक पोषक घटक असतात.
इतकेच नाही तर मधामध्ये अँटिऑक्सिडेंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म देखील भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. अशा परिस्थितीत जर तुम्ही नियमितपणे मध आणि दुधाचे सेवन केले तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तसे, मध आणि दूध प्रत्येक वर्गासाठी फायदेशीर आहे. परंतु पुरुषांच्या आरोग्याचा विचार केल्यास पुरुषांच्या अनेक समस्या ( Milk and Honey For Men) याच्या सेवनाने दूर होऊ शकतात. चला त्याबद्दल जाणून घेऊया-
1. स्पर्म काउंट वाढविण्यासाठी प्रभावी :-
बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होण्याची समस्या दिसून येते. अशा परिस्थितीत पुरुष शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी अनेक प्रकारची औषधे घेण्यास सुरुवात करतात. मात्र औषधांऐवजी पुरुषांनी घरगुती उपाय करून पाहावेत. औषधांचे दुष्परिणाम टाळण्यासाठी. जर तुम्हाला शुक्राणूंची संख्या कमी होण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर तुमच्या नियमित आहारात दूध आणि मध यांचा समावेश करा. शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी ते प्रभावी ठरू शकते.
2. टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढवतं :-
टेस्टोस्टेरॉन हार्मोन पुरुषांसाठी खूप महत्वाचे मानलं जातं . पुरुषांच्या सर्वांगीण विकासासाठी शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोनची उपस्थिती खूप महत्त्वाची असते. अनेक आरोग्य तज्ञ मध आणि दुधाचे सेवन करण्याची शिफारस करतात कारण हा टेस्टोस्टेरॉन हार्मोन पुरुष शक्ती मजबूत करतो. दूध आणि मध सेवन केल्याने टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी वाढते.
3. प्रोस्टेट कॅन्सर पासून बचाव :-
प्रोस्टेट कॅन्सर हा जास्त करून पुरुषांना होणाऱ्या आजारांपैकी एक आहे. भारतातील अनेक पुरुष या समस्येने त्रस्त असतात. प्रोस्टेट कॅन्सरमुळे होणारी समस्या टाळण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी तुम्ही मध आणि दुधाचे सेवन करू शकता. वास्तविक, कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखण्यासाठी मध उपयुक्त खूप आहे.
4. हाडे आणि स्नायू मजबूत करतं :-
मध आणि दुधाचे मिश्रण पुरुषांची हाडे मजबूत ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते. वास्तविक, दुधामध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते, जे मजबूत स्नायू आणि हाडांची बळकटता राखण्यासाठी खूप प्रभावी ठरतं . बहुतेक जीम करणाऱ्या पुरुषांना मध आणि दूध पिण्याचा सल्ला दिला जातो. त्याचा खूप फायदा होतो.
5. बद्धकोष्ठते पासून आराम :-
बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठी मध आणि दुधाचे मिश्रण खूप फायदेशीर ठरू शकते. पुरुषांमध्ये बद्धकोष्ठता असल्यास, तुम्ही त्यांना मध आणि दुधाचे मिश्रण देऊ शकता. तसेच या दुधाचे सेवन केल्याने तुम्हाला चांगली झोप येण्यास मदत होते. याचे सेवन करण्यासाठी 1 ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा मध मिसळा. याचा खूप फायदा होईल.
6. इम्यूनिटी वाढवा :-
या समस्यांव्यतिरिक्त, मध आणि दूध देखील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतं . आजकाल वाढत्या विषाणूजन्य आजारांपासून विशेषतः कोरोना संसर्गापासून दूर राहण्यासाठी मध आणि दूध फायदेशीर ठरू शकते. मध आणि दुधाचे मिश्रण सर्व वयोगटातील व्यक्तीसाठी फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच याचे सेवन करा.