Take a fresh look at your lifestyle.

दूध पिल्यानंतर माशाचं सेवन करावं का ? जाणून घ्या आहार तज्ञांकडून…

अहमदनगर टाइम्स 24 टीम, 16 जानेवारी 2022 : तुम्हाला तर माहीतच असणं की, घरामध्ये जरा एखाद्या दिवशी आहारात माशाचं कालवण / फ्राय असलं तर आपले आई – वडील आपल्याला बजावून सांगतात की, आज कोणी ही दूध पिणार नाही. जर दूध पिल्यानंतर माशाचं सेवन केलं तर किंवा मासे खाल्यानंतर दूध घेतलं तर ते आरोग्यास हानी पोहचवतं. असं आपल्या पालकांचं म्हणणं असतं.

आपल्यापैकी बरेच जण त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतात. बरेच लोक हे खोटे मानतात. पण हे खरचं एक मिथक आहे का ? जर तुमच्या मनात मासे आणि दुधाशी संबंधित प्रश्न असतील जसे कि – दूध प्यायल्यानंतर मासे खाऊ नयेत का ? मासे खाल्ल्यानंतर काय खाऊ नये ?, दूध प्यायल्यानंतर किती वेळानंतर मासे खावे ? तुमचे वगैरे वगैरे प्रश्न असतील तर काळजी करू नका.आज आपण या पोस्टमध्ये मासे आणि दुधाशी संबंधित या प्रश्नांची उत्तरे जाणून घेणार आहोत.. .

दूध प्यायल्यानंतर मासे का खाऊ नयेत ?

यासंदर्भात डायटीशियन सांगतात की, मासे खाल्ल्यानंतर किंवा दूध प्यायल्यानंतर लगेचच मासे खाऊ नयेत. वास्तविक, या दोन्ही गोष्टी विपरीत प्रवृतिच्या आहेत, ज्यामुळे तुम्हाला मळमळ, उलट्या, अपचन, गॅस सारख्या अनेक प्रकारचे पोटासंबंधी समस्या होऊ शकते. त्यामुळे मासे खाल्ल्यानंतर लगेच दुधाचे सेवन करू नका.यासाठी काही तास थांबावं .

दूध पिल्यानंतर किती वेळाने मासे खावेत ? मासे खाल्ल्यानंतर किती वेळानंतर आपण दूध पिऊ शकतो ?

डायटीशियन सांगतात की, मासे खाल्ल्यानंतर किमान 4 तास किंवा त्याहून अधिक वेळाने दुधाचे सेवन करा. जर तुम्ही रात्री मासे खात असाल तर दिवसा दूध प्या. अन् जर तुम्ही दिवसा मासे खात असाल तर रात्री दूध प्या. तुमच्यासाठी ही सर्वोत्तम वेळ असू शकते. यामुळे मासे आणि दूध मिसळण्यामुळे होणारी ऍलर्जी प्रक्रिया टाळेल. आहारतज्ञ म्हणतात की, या दोन पदार्थांच्या सेवनामध्ये सुमारे 4 तासांचे अंतर असावं. असे न केल्यास पोटाचा त्रास होऊ शकतो. एकाच दिवशी या दोन्हीचे सेवन टाळण्याचा प्रयत्न करा. तुमच्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो.

मासे खाल्ल्यानंतर काय खाऊ नये ?

मासे खाल्ल्यानंतर दुधाव्यतिरिक्त मासे खाण्यापूर्वी किंवा खाण्यापूर्वी काही गोष्टी टाळल्या पाहिजेत…

माशासोबत कधीही दही खाऊ नका. यामुळे अँलर्जी होऊ शकते.

जर तुम्हाला रात्रीच्या जेवणानंतर आईस्क्रीम खाण्याची आवड असेल तर लक्षात ठेवा की, तुम्ही ज्या दिवशी मासे खात असाल त्या दिवशी रात्रीच्या जेवणानंतर आईस्क्रीम खाऊ नका. असे केल्याने पोट आणि त्वचेशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

मासे खाल्ल्यानंतर चहा-कॉफी सारख्या गोष्टी टाळा.

मासे खाल्ल्यानंतर मिठाई न खाण्याचा प्रयत्न करा. हे तुमच्या आरोग्यासाठी खूप हेवी फूड असू शकते. त्याच वेळी, दुधापासून अनेक प्रकारच्या मिठाई तयार केल्या जातात. त्यामुळे दुधापासून बनवलेली कोणतीही गोष्ट मासे खाल्ल्यानंतर टाळावी.

Leave A Reply

Your email address will not be published.