पुणे : सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिल्यानंतर बैलगाडी शर्यत सुरु होतील अशी बैलगाडा शौकीन आणि मालकांची अशा धुळीस मिळाली. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने या बैलगाडा शर्यतीला स्थगिती दिली. असे असतानाही पुणे जिल्ह्यात बेकायदा बैलगाडा शर्यतीचं आयोजन कऱण्यात आल्याचं समोर आलं आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात या बेलगाडा शर्यती पार पडल्या. नववर्षाच्या पहिल्या दिवशी पुणे जिल्ह्यातील मावळ आणि आंबेगाव तालुक्यात बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने या बैलगाडा शर्यतीला स्थगिती दिली. त्यानंतर बैलगाडा शर्यत प्रेमींनी आणि बैलगाडा मालकांनी खेड तालुक्यात विना परवानगी बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं.
बैलगाडा शौकीन आणि मालकांनी खेड तालुक्यातील निमगाव खंडोबा या ठिकाणी बेकायदा शर्यती भरवल्या. पुणे ग्रामीण पोलिसांना चकवा देत बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. या शर्यतीत शंभरपेक्षा अधिक बैलगाडा मालकांनी सहभाग नोंदवला.
या बैलगाडा शर्यतीबाबत पोलिसांना माहिती होताच घटनास्थळी त्यांनी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत बैलगाडा शर्यती पार पडल्या होत्या आणि बैलगाडा मालक घटनास्थळावरुन निघून सुद्धा गेले होते.